अंजली दमानिया अनोळखी फोनमुळे त्रस्त

0

मुंबई : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आपल्याला वेगवेगळ्या नंबरवरुन अश्लील फोन येत असल्याचा आरोप केला आहे. सार्वजनिक ठिकाणी पत्रक चिकटवून आपला क्रमांक जाहीर करण्यात आल्याचा आरोप दमानियांनी ट्विटरवरुन केला आहे. राजकारणात कोणत्या थरापर्यंत जाऊ शकतात हे याचे उदाहरण असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. गेल्या तीन दिवसांपासून अनोळखी माणसांकडून वारंवार फोन येत आहेत. या व्यक्ती जळगाव, भुसावळ, सुरत, गोरखपूरमधील आहेत. नुकताच मला भुसावळला जाणाऱ्या पॅसेंजरमधून फोन आला. ही ट्रेन आता चाळीसगावला आहे’ असं ट्वीट अंजली दमानिया यांनी केलं आहे. ट्वीटमध्ये जोडण्यात आलेल्या फोटोमध्ये एक पत्रक दिसत आहे. ‘अंजली से खट्टी मिठी बाते करो. फ्री फ्री फ्री’ असं लिहून त्यापुढे अंजली दमानिया यांचा मोबाईल नंबर लिहिण्यात आला आहे.