भोळे महाविद्यालयात अण्णाभाऊ साठे जयंती साजरी

भुसावळ येथील दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयात दिनांक 01/08/2023 रोजी सकाळी 10 वा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली. त्याप्रसंगी त्यांच्या प्रतिमेस प्राचार्य डॉ.आर पी फालक यांनी माल्यार्पण केले

प्राचार्य डॉ आर पी फालक:- यांनी सांगितले की लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य हे परिवर्तनाला दिशा व चालना देणारे ठरले आहे. महाराष्ट्राच्या एकूणच जडणघडणीत आणि परिवर्तनात या साहित्याचे योगदान हे महत्त्वपूर्ण मानले जाते. संयुक्त महाराष्ट्र चळवळ लोकमानसात रुजविण्याचे काम शाहीर अण्णा भाऊ साठे यांनी केले. साठे यांनी मराठी भाषेत ३५ कादंबऱ्या लिहिल्या. त्यांच्या ‘फकिरा’ कादंबरीला राज्य सरकारचा उत्कृष्ठ कांदबरीचा पुरस्कार मिळालेला आहे. त्यांचे ‘माझी मैना’ हे मुंबईबद्दल लिहिलेलं गीत आजही अजरामर आहे. जो कलावंत जनतेची कदर करतो, त्याचीच कदर जनता करते. हे मी प्रथम शिकून नंतर लेखन करीत असतो. 16. नैराश्य हे धारदार तलवारीवर साचलेल्या धुळीसारखे असते, धूळ झटकली की ती तलवार पुन्हा धारदार बनते असे अण्णाभाऊ साठे यांचे विचार सांगितले

.सदर कार्यक्रमाचे आयोजन एन‌. एस .एस विभागातर्फे करण्यात आले होते. त्याप्रसंगी कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. आर बी ढाके सहाय्यक कार्यक्रमाधिकारी डॉ.जगदीश चव्हाण विद्यार्थी कल्याण अधिकारी प्रा.आर डी भोळे प्रा. अनिल सावळे प्रा. अनिल नेमाडे प्रा. एस एस पाटील प्रा. एस डी चौधरी प्रा. डॉ जी पी वाघुळदे डॉ. संजय चौधरी श्री विजय पाटील श्री सुनील ठोसर उपस्थित होते असे डॉ. संजय चौधरी प्रसिद्धी प्रमुख कळवितात