यतीनदादा ढाके यांना २०२३ चा पद्मश्री डॉ.मणिभाई देसाई राष्ट्रसेवा पुरस्कार जाहीर

जळगाव l गेल्या ६९ वर्षाची परंपरा लाभलेल्या दैनिक जनशक्तीचे मुख्य संपादक यतीनदादा ढाके यांना पद्मश्री डॉ.मणिभाई देसाई प्रतिष्ठान व भारत सरकारच्या निती आयोग सलग्न २०२३ चा *पद्मश्री डॉ.मणिभाई देसाई राष्ट्रसेवा पुरस्कार* जाहीर झाला आहे.

दैनिक जनशक्तीचे मुख्य संपादक स्व.कुंदनदादा ढाके यांच्या निधनानंतर जनशक्तीची सुत्र त्यांचे मोठे बंधू यतीनदादा (योगेश्वर) ढाके यांनी २०२१ मध्ये हाती घेतली होती. व्रुत्तपत्राच्या आजच्या जीवघेण्या स्पर्धेत जनशक्तीचे अस्तित्व टिकवून ठेवत, जनशक्तीला एका वेगळ्या उंचीवर पोहचविण्याचा यशस्वी प्रयत्न त्यांनी केला आहे, आणि त्यात त्यांना यशही मिळाले आहे. यासोबतच सामाजिक बांधिलकीची जान व भान ठेवत राष्ट्रीय एकात्मता जोपासण्याचे निरलस कार्यही दैनिक जनशक्तीच्या माध्यमातून ते करीत आहेत, त्यांच्या या आदर्श रचनात्मक कार्याची उरळीकांचन, जि.पुणे येथील पद्मश्री डॉ.मणिभाई देसाई प्रतिष्ठानने दखल घेत त्यांना भारत सरकारच्या निती आयोग सलग्न २०२३ चा *पद्मश्री डॉ.मणिभाई देसाई राष्ट्रसेवा पुरस्कार* घोषित केला आहे.

पद्मश्री डॉ.मणिभाई देसाई प्रतिष्ठान, निती आयोग, क्रिडा मंत्रालय, राष्ट्र सेवा समिती, महाराष्ट्र राज्य सलग्न हा पुरस्कार यतीनदादा ढाके यांना लवकरच प्रदान करण्यात येणार आहे.

राष्ट्रभक्तीची ज्योत तेवत ठेवण्याचे महान कार्य यतीनदादा यांच्या हातून घडत आहे आणि म्हणून त्यांना हा राज्यस्तरीय लौकिकप्राप्त पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

त्याबद्दल *मा यतीनदादांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन.!!*

????????????????????????????