पिंपरी – वारकरी संप्रदायाला ज्या क्षणाची आस लागून असते, त्या आषाढी पालखी प्रस्थानाची घोषणा शनिवारी करण्यात आली.
यंदा जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी देहूतून 10 जूनला पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. 28 जून रोजी संत तुकारामांची पालखी पंढरीत दाखल होईल. पालखी सोहळा प्रमुख भानुदास महाराज मोरे, देहू देवस्थानाचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे यांनी पालखी सोहळ्याबाबतची माहिती दिली. यंदा पालखी सोहळ्याचे 338 वे वर्ष आहे.
संत तुकारामांच्या पालखी सोहळ्याची हजारो विठ्ठल भक्त प्रतीक्षा करीत असतात. मागील वर्षी कोरोना महामारीची लाट ओसरल्यानंतर पारंपरिक पद्धतीने वारी सुरू करण्यात आली होती. इनामदार वाड्यात पालखी पहिला मुक्काम करणार आहे. यंदा संत तुकाराम महाराजांची पालखी देहूतून 10 जूनला पंढरपूरसाठी निघणार आहे. 28 जून रोजी पालखी पंढरीत दाखल होणार आहे. आषाढी एकादशीच्या सोहळ्यात 29 जूनला तुकोबांची पालखी सहभाग घेणार आहे. प्रत्यक्षात याच दिवशी तुकोबा आणि विठुरायाची भेट घडणार आहे.