शीख विरोधी दंगलीप्रकरणी कॉंग्रेस नेते सज्जन कुमार दोषी; जन्मठेपेची शिक्षा !

0

नवी दिल्ली-१९८४ मधील शीख विरोधी दंगलीप्रकरणी आज दिल्लीत उच्च न्यायालयाने निर्णय दिला. कॉंग्रेस ज्येष्ठ नेते सज्जन कुमार यांना दोषी ठरविण्यात आले आहे. त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनविण्यात आली आहे. तब्बल ३४ वर्षानंतर हा निकाल लागला आहे. सज्जन कुमार यांच्यावर शीख विरोधी दंगल भडकविण्याचे आरोप होते.

विशेषबाब म्हणजे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून आज शपथ घेत असलेले कमलनाथ यांच्यावर देखील शीख विरोधी दंगल भडकविण्याचे आरोप आहे. त्यांच्या शपथविधी सोहळ्यापूर्वी हा निकाल लागल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

आज तीन राज्यात कॉंग्रेसचे मुख्यमंत्री शपथ घेणार आहे. दरम्यान आजच हा निकाल आल्याने कॉंग्रेसच्या आनंदी वातावरणात विरजण पडले आहे.

संबंधित बातमी-मोदींप्रमाणे कमलनाथ यांनाही पदाचा लाभ मिळाला पाहिजे-शशी थरूर