नवी दिल्ली: बॉलीवूड जगतातील कलावंत नेहमी सोशल मीडियावर सक्रीय असतात. यात सोशल मीडियावर अधिक सक्रीय असणाऱ्यांमध्ये दिग्दर्शक अनुराग कश्यप यांचा समावेश आहे. खुले पणाने मत मांडण्यात अनुराग कश्यप अधिक परिचित आहे. दरम्यान त्यांना आणि त्याच्या कुटुंबाला गेल्या काही दिवसांपासून जीवे मारण्याच्या धमक्या मिळत आहेत. अनुरागचे आईवडिल आणि मुलगी यांना सतत धमकीचे फोन आणि मॅसेज येत आहेत. या धमक्यांमुळे अनुरागने स्वत:चे ट्विटर अकाऊंट डिलीट केले आहे.

मला माझे विचार निर्भीडपणे मांडता येत नसतील तर मी आता बोलणारच नाही. हे माझे अखेरचे ट्विट आहे, असे म्हणत अनुरागने ट्विटर अकाऊंट डिलीट केले.