रस्त्यावर कचरा फेकणाऱ्यावर चिडली ‘अनुष्का’; चांगलीच केली झपाई

0

नवी दिल्ली-भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा हे सोशल मीडियावर चर्चेत असणारे जोडपे आहे. अनेकदा विराट आणि अनुष्काने अनेक सामाजिक विषयांवर आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर भाष्य केले आहे. स्वच्छ भारत अभियानासंदर्भातही या दोन्ही सेलिब्रेटींनी वारंवार आपला पाठींबा दर्शवला आहे. आपल्या चाहत्यांमध्ये ‘विरुष्का’ या नावाने प्रसिद्ध असणारी जोडी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

अनुष्का शर्मा आणि विराट कोहली गाडीतून प्रवास करताना, एक व्यक्ती प्लास्टिकचा कचरा रस्त्यावर फेकत असल्याचे अनुष्काच्या लक्षात आले. यानंतर अनुष्काने त्या व्यक्तीची चांगलीच खरडपट्टी काढली. विराटने या घटनेचा व्हिडीओ काढत आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर टाकला आहे. त्याच्या या व्हिडीओला अनेकांनी आपली पसंती दर्शवली असून चाहत्यांनी अनुष्काचे कौतुक केले  आहे.