ठाणे : ठाणे जिल्हास्तरीय लोकशाही दिन २ मे २०१७ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात दुपारी १ वाजता आयोजित करण्यात आला आहे. नागरिकांनी त्यांची तक्रार तीन प्रतीत १५ दिवस आधी म्हणजेच १५ एप्रिल पूर्वी स्वत: समक्ष जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे येथील नोंदणी शाखेमध्ये पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
अन्य व्यक्तीमार्फत केलेली तक्रार लोकशाही दिनी स्वीकारली जाणार नाही. अर्जदाराने प्रथम संबधित कार्यालयाकडे / वरिष्ठ कार्यालयाकडे केलेल्या तक्रारीच्या प्रती लोकशाही दिनी सादर करावयाच्या अर्जा सोबत जोडाव्यात. तक्रारदारांबरोबर त्रयस्ताने येण्याची आवश्यकता नाही. तसेच एका तक्रार अर्जात एकच तक्रार असावी एकापेक्षा अनेक तक्रारी असलेला अर्ज स्वीकारला जाणार नाही. तक्रारदाराने प्रथम तालुका लोकशाही दिनामध्ये अर्ज करणे अनिवार्य आहे. तालुका लोकशाही दिनामध्ये अर्ज केला नसल्यास सदरहू अर्ज जिल्हा लोकशाही दिनामध्ये स्वीकारला जाणार नाही.
न्याय प्रविष्ठप्रकरणे, राजस्व / अपिल, सेवाविषयक, आस्थापना विषयक बाबी, विविध नमुन्यात नसणारे व त्यासोबत आवश्यक त्या कागदपत्राच्या प्रतीन जोडलेले अर्ज, अंतिम उत्तर दिलेले आहे / देण्यात येणार आहे अशा प्रकरणी पुन्हा केलेले अर्ज,तक्रार/निवेदन वैयक्तिक स्वरुपात नसेल तर तसेच कोणत्याही राजकीय पक्षाच्या / लोकप्रतिनिधीच्या / संस्थेच्या लेटरहेडवरील अर्ज स्वीकारला जाणार नसल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाने कळविले आहे.