अबब…जगातील १७७ देशांपेक्षा ‘अॅपल’ कंपनी श्रीमंत !

0

वॉशिंग्टन-आयफोन वापरणे हे प्रत्येक व्यक्तीचे स्वप्न झाले आहे. आयफोन ज्याच्याकडे तो आज सर्वात श्रीमंत असे मानले जाते. आयफोन बनवणारी ‘अॅपल’ कंपनी ही १ ट्रिलिअन डॉलर उलाढाल असलेली पहिली अमेरिकन लिस्टेड कंपनी बनली आहे. या एकट्या कंपनीचे उत्पन्न हे जगभरातील १७७ देशांच्या उत्पन्नापेक्षाही जास्त आहे. भारतीय रुपयांमध्ये कंपनीची वार्षिक उलाढाल सुमारे ६८,६२० अब्ज रुपये इतकी आहे.

अॅपल कंपनीची उलाढाल भारतीय अर्थव्यवस्थेच्या ३८ टक्के हिश्याऐवढी आहे. कारण, नुकताच भारताचा जीडीपी २.६ ट्रिलिअन डॉलर इतका नोंदवला गेला आहे. ३ अब्ज डॉलरची अर्थव्यवस्था असलेल्या पाकिस्तानसारख्या देशालाही सहज खरेदी करु शकते. त्याचबरोबर भारतातील दोन सर्वाधिक उत्पन्न असलेल्या कंपन्या रिलायन्स इंडस्ट्रिज आणि टीसीएस या कंपन्यांपेक्षाही अॅपल १० पट मोठी कंपनी ठरली आहे. वर्ल्ड बँकेच्या आकडेवारीनुसार, जगातील १९३ देशांपैकी केवळ १६ देशच असे आहेत ज्यांचा जीडीपी हा अॅपलच्या बाजारमुल्यापेक्षा जास्त आहे. म्हणजेच १७७ देशांपेक्षा श्रीमंत अॅपल कंपनी आहे. सध्या अॅपलची बाजार मुल्य हे इंडोनेशियाच्या जीडीपीबरोबर आहे.

या आर्थिक उलाढालीमुळे अॅपल कंपनीचा शेअर बाजारातील निर्देशांक २.८ टक्क्यांनी वढारला आहे. गेल्या तीन दिवसांपासून कंपनीच्या शेअर निर्देशांकात ९ टक्क्यांनी वाढ झाली आहे. अॅपल कंपनीने मंगळवारीच आपल्या उत्पन्नाची घोषणा केली होती. त्यानंतर बुधवारी कंपनीच्या शेअरमध्ये ६ टक्क्यांनी वाढ नोंदवली गेली. त्यानंतर यात गुरुवारी थोडी घट झाली मात्र, काही वेळातच पुन्हा यात वाढ झाली होती.