भुसावळ l
भुसावळ पालिकेचे मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांची बदली झाली असून त्यांच्या जागी जत नगरपरीषदेचे महेश वाघमोडे बदलून येत आहेत. बदली संदर्भातील आदेश शासनाचे अवर सचिव अ.का.लक्कस यांनी बुधवार, 31 मे रोजी काढले आहेत.दरम्यान, संदीप चिद्रवार यांना 31 मे पासून कार्यमुक्त करण्यात आले असून त्यांच्या बदलीचे आदेश अद्याप निघालेले नाहीत. आज महेश वाघमोडे यांनी पदभार स्विकारला