मुक्ताईनगर (प्रतिनिधी)मुक्ताईनगर येथील मुस्लिम बांधवांनी येणार्या बकरी ईद व आषाढी एकादशी एकच दिवशी येत असल्याने सर्व हिन्दु समाजाच्या धार्मिक भावनांचा आदर राखत बकरी ईदच्या दिवशी कुर्बानी न करण्याचा एकमताने निर्णय घेऊन तशा आश्याचे नमुद निवेदन मा.तहसिलदार मुक्ताईनगर व पोलीस उपविभागीय अधिकारी मुक्ताईनगर व पोलीस निरीक्षक मुक्ताईनगर यांना दिले आहे.याबाबत सविस्तर दिलेल्या निवेदनात नमूद प्रमाणे मुक्ताईनगर शहरामध्ये सर्व जाती धर्माचे लोक वर्षानुवर्ष एकता बंधुता सामाजिक सलोख्याने गुण्या गोविंदाने एकत्र राहतात.मुक्ताईनगर शहरात सणासुदीला धार्मिक कारणाने व कोणत्याही प्रकारचे वाद-विवाद किंवा अप्रिय घटना घडलेली नाही. सर्व जाती धर्माचे लोक एकत्र तन-मन-धनाने सहभागी होऊन सन साजरे करतात हीच परंपरा कायम राखता या वर्षी दिनांक 29 जुन 2023 रोजी येणारी बकरी ईद व आषाढी एकादशी हे सण एकाच दिवशी येत असल्याने सर्व हिंन्दु समाजाच्या धार्मिक भावनांचा आदर राखता मुक्ताईनगर शहरातील सर्व मुस्लिम बांधवांनी येणार्या बकरी ईदच्या दिवशी कुर्बानी न करण्याचा निर्णय एकमताने घेतला असून सर्व धर्म समभाव ही भावना मनात जागृत केली आहे व एक आगळावेगळा आदर्श मुस्लिम बांधवांनी समाजापुढे ठेवला आहे.निवेदनावर मनियार बिरादरी चे जिल्हाउपाध्यक्ष हकिम आर चौधरी,शिवसेना अल्पसंख्यांक जिल्हा संघटक अफसर खान,सलीम खान सईद खान,शेख.शकील सर नगरसेवक,शेख.अहमद ठेकेदार, शेख.मस्तान कुरैशी नगरसेवक,आसीफ बागवान,शकुर जमादार, आरीफ आझाद नगरसेवक,नुरमोहम्मद खान,शेख कलीम मनियार,लुकमान बेपारी,