नवी दिल्ली: देशाच्या सीमेवरून नेहमीच वाद होत आले आहे. काही सीमा प्रश्नांचा वाद हा ऐतिहासिक मुद्दा बनला आहे. दरम्यान केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी देशाच्या सीमांचा इतिहास लिहिण्याच्या कामाला मान्यता दिली आहे. भारतीय ऐतिहासिक संशोधन परिषद, नेहरू मेमोरियल संग्रहालय, अभिलेखागार महासंचालक, एमएचए, एमईए आणि संरक्षण मंत्रालय यांच्यासोबत बैठक घेऊन संरक्षण मंत्र्यांनी सीमांचा इतिहास लिहिण्यास परवानगी दिली आहे. दोन वर्षात हा इतिहास लिहून पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे.