पुणे: राज्यभरात आपल्या भूमिकेद्वारे सगळ्यांचे लक्ष वेधून घेणारी रिंकू राजगुरूने १२वी च्या निकालात पण सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले असून रिंकूला ८२ टक्के गुण मिळाले आहे. रिंकू ही शाखेला होती.
रिंकूला १०वीत ६६.१० टक्के मिळाले होते. तिने १२ वी ची परीक्षा सोलापूर जिल्ह्यातील टेंभूर्णी येथील तुळजाभवानी कला व विज्ञान कनिष्ठ आश्रम महाविद्यालयातून परीक्षा दिली होती. परीक्षे दरम्यान तिला बघण्यासाठी गर्दी होऊ नये म्हणून पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
या वर्षी रिंकू राजगुरूचे कागर चित्रपट प्रदर्शित झाला आहे, पुढे येणाऱ्या काळात अजून एक चित्रपट येणार असुन त्याची शुटींग चे काम बेळगाव येथे सुरु आहे.