लाच प्रकरणी दोघांना न्यायालयीन कोठडी जामीन अर्जावर उद्या युक्तीवाद होणार

भुसावळ, प्रतिनिधी । शेतजमीन खरेदीनंतर सातबारा उताऱ्यावर शेतकऱ्याचे नाव लावून देण्याचे काम करून देण्यासाठी १५ हजारांची लाच मागून तडजोडीअंती १२ हजार रुपयांची लाच घेताना भुसावळ सजाचे कोतवाल रवींद्र लक्ष्मण धांडे (वय ५४, रा. भुसावळ) व खासगी कर्मचारी हरी देविदास ससाणे (वय ४४, रा. आंबेडकर नगर, भुसावळ) यांना जळगाव एसीबीने मंगळवारी अटक केली होती. लाचखोरांना शुक्रवारी दोन दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानंतर अतिरिक्त सत्र न्यायालयात हजर केले होते. तेव्हा त्यांना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान, संशयितांतर्फे जामिनासाठी अर्ज करण्यात आल्यानंतर सोमवारी दिवसांची या अर्जावर बुक्कीवाद होणार असल्याची माहिती मुदत संपल सूत्रांनी दिली.