मुंबई- गेल्या काही दिवसांपासून अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा यांच्या संबंधाबाबत अनेक चर्चा सुरु आहे. दोघंही लग्न करणार असल्याची चर्चा आहे. मात्र या चर्चेबाबत दोघांच्य जवळील एका मित्राने मोठा खुलासा केला आहे. दोन्ही एकमेकांच्या संपर्कात आहे मात्र दोन्हीही लग्न करणार या चर्चेत तथ्य नसल्याचे जवळच्या मित्राने स्पष्ट केले आहे. त्यामुळे या चर्चेला पूर्ण विराम मिळाले आहे.
अर्जुन कपूर हा एक जबाबदार भाऊ आहे कारण त्याची बहिण अंशुला कपूरचे लग्न अद्याप बाकी आहे. अंशुलाच्या लग्नाशिवाय तो लग्न करणार नाही असेही अर्जुनच्या मित्राने सांगितले आहे.