मुंबई-अर्जुन कपूर व मलायका अरोरा यांच्यातील नाते आता लपून राहिलेले नाही. आतापर्यंत अर्जुन व मलायका दोघेही मीडियासमोर एकत्र येणे टाळत होते. मात्र आता दोन्ही देखील आता त्यांच्यातील नात्याबाबत बोलतात.
काल अर्जुन व मलायका एका प्री-ख्रिसमस पार्टीत दिसले. या पार्टीत अर्जुन व मलायका दोघेही एकाच गाडीतून आले होते. या गाडीत मलायका अर्जुनच्या मागच्या सीटवर दिसली. तर अर्जुन कपूर सोबत काका संजय कपूर दिसले.
मलायका व अर्जुन यांना यापूर्वी अनेक पार्ट्यांमध्ये एकत्र पाहिले गेले आहे. पण प्रथमच अर्जुनच्या गाडीत मलायका दिसली. येत्या एप्रिलमध्ये अर्जुन व मलायका दोघेही लग्न करणार, असे मानले जात आहे. दोघांनीही मुंबईत एक अपार्टमेंट देखील खरेदी केले आहे.
अर्जुनने देखील त्यांच्या नात्याबाबत दुजोरा दिला आहे. अलीकडे ‘कॉफी विद करण’मध्ये बोलताना अर्जुनने अप्रत्यक्षपणे लग्नाचे संकेत दिले होते.’मी सिंगल नाही, असे अर्जुन म्हणाला होता. अर्जुनच्या या खुलाशाने त्याची बहीण जान्हवी कपूर हिलादेखील आश्चयार्चा धक्का बसला होता. तुझ्या पार्टनरला तुझ्या कुटुंबियासोबत कधी भेटवणार, असे करणने विचारल्यावर, माझ्या कुटुंबासमोर आता मी कबूल केलेच,असे त्याने सांगितले होते. त्यावर मला आत्ता इथे ही गोष्ट कळली असे जान्हवी म्हणाली होते. लग्नासाठी तू तयार आहेस का,असे करणने विचारले असता पूर्वी मी लग्न या गोष्टीसाठी तयार नव्हतो. पण आता मी लग्न करायला तयार आहे, असे तो म्हणाला होता.