अर्जुन कपूरच्या ‘इंडियाज् मोस्ट वॉन्टेड’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज !

0

मुंबई:अर्जुन कपूरच्या बहुप्रतिक्षीत ‘इंडियाज् मोस्ट वॉन्टेड’या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. राज कुमार गुप्ता दिग्दर्शित हा सिनेमा एका सत्यघटनेवर आधारित आहे. त्यामुळे या चित्रपटाबद्दल कमालीची उत्सुकता लागली आहे. या चित्रपटात एका कुख्यात गुन्हेगाराची कथा रेखाटण्यात आली आहे.

ट्रेलरची सुरूवात होते बॉम्बस्फोटांच्या दृश्यांनी. स्वत:ला भारताचा ओसामा बिन लादेन समजणा-या एका स्वंयघोषित ‘मोस्ट वॉन्टेड’ गुन्हेगाराला पाच जण कसे पकडतात, ते ट्रेलरमध्ये दाखवण्यात आले आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये कुठलाही रोमॅन्टिक वा फार भावूक असा सीन नाही. तर ‘हार्ड कोर’अतिरेक्यांचे जग आणि देशाची व्यवस्थेचे वास्तव दाखवणारा हा ट्रेलर आहे.

या सिनेमात अर्जुनशिवाय अमृता पुरी आणि राजेश शर्मा यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. काही दिवसांपूर्वी या सिनेमाचा टीजर प्रदर्शित करण्यात आला होता. या टीजरमध्ये भारतात दहशतवादी हल्ले घडवणा-या मागे असलेली व्यक्ती सातत्याने एकच गोष्ट सांगताना दिसली होती.ती म्हणजे, शरीर मरतं पण आत्मा मरत नाही. मी लोकांना मारत नाही. फक्त त्यांचा आत्मा एका शरीरातून दुसº्या शरीरात पाठवतो, असे मी नाही गीतेत श्रीकृष्णाने म्हटले आहे, असे तो सांगतो. यानंतर टीजरमध्ये चार नवीन व्यक्तिरेखा समोर येतात. हे चारही अर्जुन कपूरसोबत भारताच्या या स्वयंघोषित ओसामाला पकडण्याच्या तयारीला लागतात. हा टीजर प्रेक्षकांना आवडला होता.