अर्जुन रामपाल यांनी घेतला घटस्फोट

0

मुंबई-बॉलिवूडमध्ये एकीकडे लग्नाच्या चर्चा होत असताना दुसरीकडे मात्र अर्जुन रामपाल आणि त्याची पत्नी मेहर हिने आपण विभक्त होत असल्याचा निर्णय सांगून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. ‘मिस इंडिया’चा किताब पटकावणाऱ्या मेहर जेसिया आणि अर्जुनने २० वर्षांपूर्वी लग्न केले होते. पण, गेल्या काही वर्षांपासून दोघांमधील मतभेद वाढू लागल्याने अखेर विभक्त होण्याचा टोकाचा निर्णय या दोघांनी घेतला असल्याचे बोलले जात आहे.

‘सहजीवनाच्या २० वर्षांच्या सुंदर प्रवासानंतर आता आमचे मार्ग वेगळे झाले आहे. आता आम्ही वेगवेगळ्या मार्गाने जायचे ठरवले आहे. पण आम्ही एकमेकांसोबत कायम राहू, एकमेकांच्या मदतीला नेहमीच धावून येऊ.’ असा संदेश लिहित या दोघांनी घटस्फोटाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. अर्जुन आणि मेहर यांना दोन मुली आहेत त्यामुळे या दोघींसाठी आम्ही नेहमीच एकत्र असू पण त्याचवेळी आम्ही एकमेकांच्या खासगी आयुष्यात डोकावणार नाही, याचीही पुरेपुर काळजी घेऊ असेही या दोघांनी म्हटले आहे. नातं संपतं पण, प्रेम मात्र आयुष्यभर जिवंत राहतं, अशा प्रकारे विभक्त होण्याचा निर्णय जाहीर करणे आम्हाला विचित्र वाटत असले तरी आम्ही चाहत्यांना सत्य सांगण्याचा प्रयत्न केला आहे असंदेखील दोघांनी प्रसिद्ध केलेल्या विधानात म्हटले आहे.