अभिनेते अर्जुन रामपाल यांना मातृशोक !

0

मुंबई- बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपाल याची आई ग्वेन रामपाल यांचे ६७ व्या वर्षी निधन झाले. त्या कर्करोगाने ग्रस्त होत्या. काल संध्याकाळी उशीरा न्यू वरळी येथील निवासस्थानावरून त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. चार वर्षांपूर्वी ग्वेन रामपाल यांना ट्रिपल निगेटीव्ह ब्रेस्ट कॅन्सर असल्याचे निदान झाले होते.

अर्जुन कपूरने आपल्या ट्विटर हँडलवर आईने कॅन्सरशी असलेली लढाई जिंकल्याचे जाहिर केले होते.

या शोकाकुल वातावरणात अर्जुन रामपालला आधार द्यायला त्याची गर्लफ्रेन्ड गॅबरिला हजर होती. ती पूर्णवेळी अर्जुनसोबत दिसली. अर्जुन व गॅबरिला दीर्घकाळापासून एकमेकांना डेट करत आहेत. अर्जुनची पूर्वाश्रमीची पत्नी मेहर ही सुद्धा आपल्या दोन मुलींसह यावेळी दिसली. याचवर्षी मे महिन्यांत अर्जुन आणि मेहर यांनी आपले २० वर्षे जुने नाते संपवत, घटस्फोट घेतला.