सैन्य दिन: पंतप्रधान मोदींनी सैनिकांना दिल्या शुभेच्छा !

0

नवी दिल्ली-आज देशात सैन्य दिन साजरा केला जात आहे. दरवर्षी भारतीय लष्कराकडून १५ जानेवारी हा दिवस सैन्य दिन म्हणून साजरा करण्यात येतो. यंदाचे वर्ष हे सैन्य दिनाचे ७१ वे वर्ष आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय सैन्य दलाला सैन्य दिनानिमित्त शुभेच्छा देत, सैन्यांच्या शौर्याबाबत अभिमान व्यक्त केले आहे.

सैन्य दिनानिमित्त सोशल मीडियावरही सैन्याच्या जवानांना सलामी दिली जात आहे. #ArmyDay हा हॅशटॅग ट्विटवर ट्रेण्ड होत आहे.

१५ जानेवारी १९४९ रोजी जनरल करियप्पा यांनी भारताचे पहिले लष्कर प्रमुख म्हणून सूत्र स्वीकारली होती. भारतातील ब्रिटीश कमांडर इन चिफ जनरल सर फ्रान्सिस बचर यांच्याकडून करियप्पा यांनी सूत्रे हाती घेतली होती. या ऐतिहासिक क्षणानिमित्त १५ जानेवारी हा सैन्य दल दिवस म्हणून साजरा केला जातो.

भारतीय लष्कराला गौरवशाली इतिहास आहे. भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर चीन आणि पाकिस्तानबरोबर झालेल्या युद्धात, तसेच कारगीलमध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या घुसखोरीच्या वेळी निर्भयपणे भारतीय जवानांनी शत्रुचा पराभव केला. स्वातंत्र्योत्तर काळामध्ये देशामध्ये शांतता प्रस्थापित करण्यामध्येही जवानांचा सहभाग आहे.