नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याची आणि पत्नीमधील वाद सर्वश्रुत आहे. दरम्यान आता शमीच्या अडचणी वाढल्या आहेत. पत्नी हसीन जहाँने कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप केल्याने शमीविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. पश्चिम बंगालच्या अलीपूर कोर्टाने हे वॉरंट जारी केले आहे. क्रिकट पटू मोहम्मद शमी आणि त्याचा भाऊ हसीद अहमद या दोघांविरोधात हे वॉरंट जारी करण्यात आले आहे. सरेंडरसाठी त्याला कोर्टाने १५ दिवसांची मुदत दिली आहे. या कालावधीत शमी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करु शकतो असेही कोर्टाने म्हटले आहे. मात्र शमीविरोधात आणि त्याच्या भावाविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आल्याने त्याच्या अडचणींमध्ये भर पडली आहे.