भुसावळ प्रतिनिधी दि 1 उप विभागीतील नशिराबाद पोलीस स्टेशन हद्दीतील मणियार कब्रस्तानच्या समोर नाल्याच्या पलीकडे असलेल्या नवीन सिमेंटच्या पक्के घराच्या खालच्या मजल्यात महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेल्या गोवंश जातीच्या जनावरांचे कत्तल करून मास विक्रीच्या उद्देशाने बाळगतांना ३०० रुपये किंमतीचे दहा किलो साहित्य सह संशयित आरोपी सलीम शहा खालील शहा (वय ३२) राहणार काझीपुरा नशिराबाद, शेख मेहबूब शेख गुलजार (वय ४१) राहणार फुकटपुरा नशिराबाद या दोघांना ताब्यात घेतले असून यांच्याकडून मिळून आल्याने पोना. हेमंत प्रकाश मिटकरी यांच्या फिर्यादीवरून नशिराबाद पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकॉ.युनूस शेख करीत आहे.