बहुआयामी अरुण जेटलींचा थक्क करणारा जीवनप्रवास !

0

नवी दिल्ली: देशाचे माजी अर्थमंत्री आणि भाजपाचे पहिल्या फळीतील नेते अरुण जेटली यांचे आज निधन झाले. दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांनी अखेरचे श्वास घेतले. उद्या दुपारी त्यांच्यावर दिल्लीत अंत्यसंस्कार होणार आहे. अरुण जेटली यांच्या निधनाने देशभरात राजकीय क्षेत्रासह विविध क्षेत्रातून शोक व्यक्त होत आहे. आपली जीवनात त्यांनी अनेक चढ-उतार पहिले आहे. विद्यार्थी नेता ते देशाचा अर्थमंत्री हा त्यांचा प्रवाश अत्यंत थक्क करणारा आहे. दरम्यान आता आपण त्यांच्या यशस्वी कारकिर्दीवर प्रकाश टाकणार आहोत.

*भाजपच्या स्थापनेनंतर १९८० साली पक्षाच्या युवा संघटनेचे अध्यक्ष

*सर्वोच्च न्यायालयात वकिली

*१९८९ साली विश्वनाथ प्रताप सिंह यांच्या सरकारने अरूण जेटली यांची अतिरिक्त सॉलिसिटर जनरल पदावर नियुक्ती केली. या काळात त्यांनी बोफोर्स घोटाळ्याच्या चौकशीची कागदपत्रे तयार केली होती.

*१९९९ साली केंद्रात भाजपची सत्ता आल्यानंतर कायदा व सामाजिक न्याय, माहिती व प्रसारण मंत्री आणि राज्य निर्गुंतवणूक या खात्यांच्या राज्यमंत्रीपदाची जबाबदारी

*२००० पासून राज्यसभेवर खासदार, २००९ साली राज्यसभेत विरोधी पक्ष नेते

*अरूण जेटली यांनी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीतही भाजपची रणनीती आखली. या निवडणुकीत पक्षाला प्रचंड यश मिळण्यात त्यांचा मोठा वाटा होता. या निवडणुकीत त्यांनी अमृतसरमधून पहिल्यांदाचा लोकसभा निवडणूक लढवली. मात्र, काँग्रेसचे नेत कॅ. अमरिंदर सिंग यांच्याकडून त्यांना पराभव स्वीकारावा लागला.

*२०१४ पूर्वी त्यांनी बीसीसीआयचे उपाध्यक्ष म्हणूनही कारभार सांभाळला.

*२०१४ मध्ये आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरण समोर आल्यानंतर जेटलींनी बीसीसीआयच्या उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिला.

*२०१४ साली मोदी सत्तेत आल्यानंतर अर्थमंत्री