अरुण जेटली घरी परतले

0

नवी दिल्ली: केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांच्यावर एम्स रुग्णालयात मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. ते गेल्या तीन आठवड्यापासून रुग्णालयात होते. अखेर त्यांना रुग्णालयातून सुट्टी मिळाली आहे. त्यामुळे ते तीन आठवड्यानंतर घरी परतणार आहे. ही माहिती अरुण जेटली यांनी ट्वीटद्वारे दिली आहे. “गेले तीन आठवडे डॉक्टर, नर्सिंग ऑफिसर आणि पॅरामेडिक्स यांनी माझी विशेष काळजी घेतली. सर्वांचे त्यांनी आभार मानले आहे.

ते केंद्रात अर्थमंत्री आहे. सध्या ते रुग्णालयात होते म्हणून त्यांच्या जागी अर्थ खात्याची जबाबदारी रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्याकडे होती.