नवी दिल्ली – दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या मंत्र्यांचा राजभवानातील धरणे आणि उपोषणाचा आज शनिवार सहावा दिवस आहे. उपोषणाच्या चौथ्या दिवसापासून आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांचे वजन १ किलो २०० ग्रॅम वाढले आहे. राजभवनाच्या अधिकाऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले, की शुक्रवारी दुपारी जैन यांचे चेकअप करण्यात आले, तेव्हा ही माहिती समोर आली आहे.
उपोषणावर प्रश्नचिन्ह
केजरीवाल आणि त्यांच्यासोबत धरणे आंदोलन करणाऱ्या मंत्र्यांचे दैनंदिन रुटिन चेकअप सुरु आहे. गुरुवारी सायंकाळी डॉक्टरांनी जैन यांची तपासणी केली त्यात त्यांचे वजन 80.3 किलोग्रॅम असल्याची नोंद होती. तर, शुक्रवारी दुपारी वजन केले तेव्हा ८१ किलो २०० ग्रॅम भरले. म्हणजे एका दिवसात १.२ किलोने त्यांचे वजन वाढले. यामुळे मंत्र्यांच्या उपोषणावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.