केजरीवाल यांनी तिकिटासाठी ६ कोटी रुपये घेतले; उमेदवाराच्या मुलाचे आरोप !

0

नवी दिल्ली: दिल्लीतील आम आदमी पक्षाचे पश्चिम दिल्लीतील उमेदवार बलबीरसिंग जाखर यांचे पुत्र उदय जाखर यांनी माझ्या वडिलांना उमेदवारी देण्यासाठी आम आदमी पक्षाने ६ कोटी रुपये घेतल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. तीन महिन्यापूर्वी माझे वडील राजकारणात आले, त्यांनी आम आदमी पक्षाकडून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. त्यांना उमेदवारी देण्यासाठी केजरीवाल यांनी ६ कोटी रुपये मागितल्याच आरोप उमेदवाराच्या मुलाने केले आहे. उदय जाखर याने एक व्हिडीयो जाहीर केला आहे. यावरून त्यांनी आरोप केले आहे.