२००० रूपयांच्या नोटबंदीवरून अरविंद केजरीवाल यांचे मोदींवर टीकास्त्र!

मुंबई : भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) ने २००० रूपयांच्या नोटा वितरणातून काढून घेण्याच्या निर्णयाची घोषणा केली. तसेच ३० सप्टेंबर पर्यंत नागरिकांनी या नोटा बँकेत जमा कराव्या असे RBI ने म्हटलं आहे. यावरून दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.

अरविंद केजरीवाल ट्वीटकरत म्हणाले की, २००० ची नोट आणून भ्रष्टाचार थांबेल, असे प्रथम सांगितले..आता ते म्हणत आहेत की २००० ची नोट बंद केल्याने भ्रष्टाचार संपेल, म्हणूनच आम्ही म्हणतो, पंतप्रधान शिक्षित असावेत. निरक्षर पंतप्रधानांना कोणीही काहीही म्हणू शकतो, त्याला समजत नाही..याचा त्रास जनतेला सहन करावा लागत आहे.

दरम्यान, आरबीआयने २००० रुपयांच्या नोटा असलेल्या नागरिकांना बँकांमधून नोटा बदलण्याची सूचना केली आहे. बँकांमध्ये २३ मे पासून ही २००० रुपयांची नोट बदलण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. नागरिकांना ३० सप्टेंबरपर्यंत नोटा बदलता येणार असल्याची माहिती आरबीआयने दिली आहे.