यावल सातोद वड्री मार्गावरील रस्ता अरूंद असल्याने वाहनधारकांच्या अडचणी वाढल्या प्रशासकीय कारभारावर नागरीक नाराज
यावल ( प्रतिनिधी ) येथील शहराला प्रमुख गावांशी जोडणाऱ्या व नेहमीच वर्दळीचा असलेला सातोद कोळवद मार्गावरील रस्ता अरुंद असल्याने शेतकऱ्यांना व वाहनधारकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असुन, या ग्रामीण क्षेत्रातील नागरीकांच्या प्रश्नाकडे लोकप्रतिनिधी गांर्भीयाने लक्ष देत नसल्याचे ग्रामस्थांमध्ये बोलले जात असुन या मार्गाची रूंदी वाढवावी अशी मागणी परिसरातुन होत आहे . यावल तालुक्यातील वड्री, परसाडे, सातोद, कोळवद ,डोंगर कठोरा आदी गावाशी शहराच्या बाजार पेठला जोडणारा सातोद कोळवद, वड्री हा सुमारे १० किलोमिटर च्या मार्गावर विविध वाहनांची नेहमीच वर्दळ असते त्यात रस्त्याचे रूंदीकरण नसल्याने वाहनधारकांना वाहने चालवितांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असुन प्रसंगी अपघातांना सामोरे जावे लागत आहे . दरम्यान या मार्गाच्या रूंदीकरणांचा प्रस्ताव अनेक वेळा संबधीत विभागाकडे पाठविण्यात आले असुन अद्याप पर्यंत या मार्गाच्या रूंदीकरणाच्या कामास प्रशासकीय मान्यता मिळत नसल्याने सदरचे हे रस्ता रुंदीकरणाचे काम मागील तिन ते चार वर्षापासुन प्रलंबीत असल्याने परिसरात राहणारे ग्रामस्थ व शेतकरी बांधवांमध्ये लोकप्रतिनिधी सह प्रशासकीय कारभार नाराजी व्यक्त करण्यात येत आहे .