पोदार इंटरनॅशनल स्कूलमध्ये आषाढी एकादशी व ‘ईद-उल-अधा’ उत्साहात साजरे करण्यात आले.

भुसावळ प्रतिनिधी दि 28

पोदार इंटरनॅशनल स्कूलमध्ये आषाढी एकादशी व ‘ईद-उल-अधा’ उत्साहात साजरा करण्यात आला.शाळेच्या विद्यार्थांनी नियमित होणाऱ्या प्रार्थनेच्या वेळी हे सण साजरे केले. नंतर पोदार शाळेच्या इयत्ता २ री, 3 री, 4 थी, ५ वी चा वर्ग , व ८ वी च्या विद्यार्थांनी आषाढी एकादशी निमित्त दिंडी काढली या दिंडीत विद्यार्थांनी वारकरी पेहराव करून विठ्ठलाच्या गाण्यावर करताल वाजवत नृत्य केले. ‘ईद उल -अधा’ या सणाचे महत्व इयत्ता ९ वीच्या विद्यार्थांनी प्लाकार्ड वरील चित्रांच्या सहायाने सांगितले.सूत्रसंचालन तनिष्का वर्मा व विवान वाघुळदे ह्यांनी केले.शाळेचे प्राचार्य आनंद हिरालाल शाह यांनी नृत्यातील सहभागी विद्यार्थांचे कौतुक केले व आषाढी एकादशी व ‘ईद-उल-अधा’ सणाचे महत्व सांगून विद्यार्थांना सुभेच्छा दिल्या. व्यासपीठावर विठ्ठलाची भव्य प्रतिमा तसेच संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर यांचीही कागदी प्रतिमा साकारण्यात आली होती.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे व्यवस्थापक रामदास कुलकर्णी व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वर्गाने अथक परिश्रम घेतले.