भुसावळ प्रतिनिधी l
वरणगांव येथिल महात्मागांधी विद्यालयतील क्रीडा शिक्षक आशिष चौधरी यांना क्रीडा गौरव पुरस्कार घोषित करण्यात आला. विभागीय आदर्श क्रीडा गौरव पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल अभिनंदन आपण शारीरिक शिक्षण क्रीडा शिक्षक म्हणून घडवलेल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शालेय तसेच महाविद्यालयीन , राज्य, राष्ट्रीय , आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळाडूसाठी आपल्या दैदिप्यमान कामगिरीमुळे आपली निवड पुरस्कार समितीने केली आहे. दी.14 मे 2023 रोजी धुळे येथे क्रीडा क्षेत्रातील मान्यवर पदाधिकारी इतर मान्यवर मंडळी यांच्या उपस्थितीत भव्य कार्यक्रमात प्रदान करण्यात येणार आहे. आधी सुद्धा जळगाव जिल्हा क्रीडा विभाग कडून जिल्हा आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार बहाल झाला आहे. एज्युकेशन सोसायटी वरणगाव संस्थेचे शालेय समिती चेअरमन सहकार मित्र चंद्रकांत हरी बढे संस्थेच्या अध्यक्ष सौ वंदना पाटील यांचे सह संस्थेचे सर्व पदाधिकारी, महात्मा गांधी विद्यालय मुख्याध्यापिका सौ वंदना चव्हाण मॅडम, उपमुख्याध्यापक पी .जे. पाटील , पर्यवेक्षक बी एम राठोड आर एस कोल्हे व सर्व शिक्षक शिक्षकेतर त्याचबरोबर विकासोसायटी वरणगाव, जिल्हा क्रीडा यांच्या वतीने, मित्र, नातेवाईक, विविध संघटनांच्या माध्यमातून आशिष चौधरी सर यांचे अभिनंदन केले जात आहे.