जकार्ता – १८ व्य आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय नेमबाज सौरभ चौधरी याने सुवर्ण पदक तर अभिषेक वर्मा याने कांस्य पदकाची कमाई केली आहे. 10 मीटर एअर पिस्तुल प्रकारात त्यांनी हे यश मिळविले. या यशाबरोबरच अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.
पात्रता फेरीत सौरभने सहाa राऊंडमध्ये 586 गुणांची कमाई करताना अव्वल स्थान पटकावले, तर अभिषेकने 580 गुणांसह सहावे स्थान घेतले. 10 मीटर एअर पिस्तुल प्रकारात अभिषेक वर्माने कांस्यपदकाची कमाई केली आहे. भारतीय महिला संघाचा ब गटात व्हिएतनामकडून 3-0 असा पराभव झाला आहे.
आशियाई स्पर्धेच्या तिसऱ्या दिवसाच्या सकाळच्या सत्रात महाराष्ट्राच्या सुपुत्रांनी यशस्वी सुरुवात केली.कोल्हापूरचा जलतरणपटू विरधवल खाडेने 50 मीटर फ्री स्टाईल गटाच्या पात्रता फेरीत 22.43 सेकंदाची वेळ नोंदवली. त्याने नवा राष्ट्रीय विक्रम नोंदवताना अंतिम फेरीतील स्थान निश्चित केले. 2010च्या ग्वांझाऊ आशियाई स्पर्धेत विरधवलने 50 मीटर बटरफ्लाय गटात कांस्यपदक जिंकले होते.
आशियाई रोइंग अजिंक्यपद स्पर्धेत स्पर्धेत रौप्यपदक जिंकणाऱ्या नाशिकच्या दत्तू भोकनळने पुरूष एकेरी स्कल प्रकाराच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. त्याने रेपेचेज राऊंडमध्ये 7 मिनिटे 45.71 सेकंदाची वेळ नोंदवली. कबड्डीत भारतीय महिला संघाने सलग तिसरा विजय मिळवला. त्यांनी श्रीलंकेचा 38-12 असा एकतर्फी पराभव केला.