एशियाडमध्ये सुशील कुमारचा पहिल्याच दिवशी पराभव

0

जकार्ता-दोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेता भारताचा आघाडीचा कुस्तीपटू सुशील कुमारला आज एशियाड खेळांच्या पहिल्या दिवशी पराभवाचा सामना करावा लागला आहे. पहिल्याच सामन्यात ७४ किलो वजनी गटात सुशील कुमारचा बहारिनच्या अॅडम बतिरोव्हने पराभव केला. सामन्यात सुरुवातीला आघाडी घेऊनही, अखेरच्या सत्रात केलेला बचावात्मक खेळ सुशीलला महागात पडला.

सुशीलवर मात करणारा बतिरोव्ह अंतिम फेरीत गेल्यास सुशीलला रेपिचाजमध्ये कांस्यपदकासाठी लढण्याची संधी मिळणार होती. मात्र बतिरोव्हला उपांत्य फेरीत पराभवाचा सामना करावा लागल्यामुळे सुशीलचं या स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात आलं आहे. या स्पर्धेत भारताला सुशीलकडून पदकाची आशा होती, मात्र सुशीलने आपल्या चाहत्यांना निराश केलं आहे.