जकार्ता :१० मीटर नेमबाजीच्या मिश्र दुहेरी प्रकारात अपूर्वी चंदेला आणि रवी कुमार जोडीने कांस्य पदक पटकावले आहे. आशियाई स्पर्धा २०१८ मध्ये भारताने पहिल्याच दिवशी पदकांचे खाते खोलले.
पात्रता फेरीत पाचव्या स्थानावल असलेल्या चीनी ताइपेच्या नेमबाजांनी सुवर्ण तर चीनने रौप्य पदकाची कमाई केली. रवी कुमारसाठी वैयक्तिक स्वरुपात ही मोठी कामगिरी आहे. २८ वर्षीय रवी कुमारने २०१४ मध्ये आशियाई स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकले होते आणि २०१८ मध्ये कॉमनवेल्थ गेम्समध्ये त्याने कांस्य पदक जिंकले होते. भारतीय जोडीचा पात्रता फेरीतला स्कोअर ८३५.३ होता तर कोरियाने ८३६.७ गुण मिळवत भारताच्या पुढचे स्थान पटकावले होते . अपूर्वी चंदेलाने २०१४ च्या कॉमनवेल्थ स्पर्धांमध्ये सुवर्णपदक जिंकले होते.