जकार्ता – आशियाई स्पर्धा २०१८ चा आज दुसरा दिवस असून भारतीय नेमबाज दीपक कुमार याने रोप्य पदकाची कमाई केली आहे.
आजच्या दिवशी भारतीय कुस्तीपटू आणि नेमबाजांकडून भारताला पदकाची अपेक्षा आहे. नेमबाज दीपकने १० मीटर एअर रायफल प्रकारात रौप्य पदक मिळवला. आता भारताची पदकांची संख्या ३ वर गेली आहे. यामध्ये एक स्वर्ण, एक रौप्य आणि एका कांस्य पदकाचा समावेश आहे.