नवी दिल्ली: सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात अफवा पसरविण्याचे काम केले जाते. त्यामुळे सामाजिक ऐक्याला धोका निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता, सोशल मीडिया अकाऊंटला आधारशी जोडण्याबाबत शासनाचा विचार सुरु आहे. मात्र याबाबत अद्याप कोणतेही पाऊल उचलण्यात आलेले नसल्याने सुप्रीम कोर्टाने याबाबत केंद्र सरकारला विचारणा केली आहे. सोशल मीडिया अकाऊंटला आधारशी जोडण्याच्या निर्णयावर विचार सुरू आहे की नाही याबाबत सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला 24 सप्टेंबरपर्यंत माहिती देण्यास सांगितले आहे.