नाशिक – शहरात दिवसाढवळ्या झालेल्या भाजपा नेत्याच्या हत्येमुळे एकच खळबळ माजली आहे. नाशिकमध्ये सातपूर भाजपा मंडल अध्यक्ष अमोल इघे यांची हत्या झाल्यान शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे
अज्ञात व्यक्तीने अमोल इघे यांना शुक्रवारी सकाळी फोन करून बाहेर बोलावलं. यानंतर त्याने धारधार शस्त्राने अमोल इघे यांच्यावर वार करत हत्या केली. राजकीय पूर्ववैमनस्यातून ही हत्या झाल्याची शक्यता पोलीस व्यक्त करत आहेत, दरम्यान दिवसाढवळ्या नेत्याची हत्या करण्यात आल्याने शहरात खळबळ माजली आहे.
भाजपा कार्यकर्ते आक्रमक
अमोल इघे यांच्या हत्येनंतर भाजपा कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. कार्यकर्त्यांनी सातपूर पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन सुरु केलं आहे. आरोपींना लवकरात लवकर पकडून कडक कारवाई करण्याची मागणी त्यांच्याकडून केली जात आहे.