जळगाव: राज्याच्या विधानसभा निवडणुकीसाठी आज सोमवारी २१ रोजी मतदान होत आहे. सकाळी ७ वाजेपासून मतदानाला सुरुवात झाले होते. सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदानासाठी रांगा लागल्या होत्या. दरम्यान सायंकाळी ५ वाजेपर्यंतची आकडेवारी समोर आली आहे. सायंकाळी ५ वाजेपर्यंत ५४.५९ टक्के मतदान जळगाव जिल्ह्यात झाले आहे.
यात चोपडा मतदारसंघ ५५.३३ टक्के, रावेर ६१.४२, भुसावळ ४१.२६, जळगाव शहर ३९.३१, जळगाव ग्रामीण ५२.६९, अमळनेर ५८.६८, एरंडोल ५५.७७, चाळीसगाव ५५.७५, पाचोरा ५२.१२, जामनेर ५९.१४, मुक्ताईनगर ६०.४८ टक्के असे एकुण ५४.५९ टक्के मतदान झाले आहे. यात सर्वाधिक ६० टक्के मतदान रावेर मतदारसंघात तर सर्वात कमी मतदान जळगाव शहर मतदारसंघात ३९.३१ टक्के मतदान झाले आहे.