यावल प्रतिनिधी l
येथील बस स्थानकावर अर्ध्या प्रवासात सवलती मुळे महिलांची वर्दळ वाढली असून, आज दुपारी यावल चाळीसगाव गाडी मध्ये चढताना एका महिलेची सुमारे १ लाख८० हजार रूपये किमतीची अडीच तोडे सोन्याची पोत चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली आहे .
यावलच्या बस स्थानकावर चोऱ्यांचे प्रमाण वाढलेले असून दिनांक १६ मे२०२३ मंगळवार रोजी दुपारी पावणेतीन वाजेला लागणारे यावल चाळीसगाव गाडीमध्ये एक प्रवासी महिला चढत असताना तिची अडीच तोडे सोन्याची पोत चोरट्याने लंपास केली
यावल बसस्थानकावरून ही गाडी चोपड्याकडे जाण्यासाठी मार्गस्थ झाली वडोदा गावा जवळ तिकीट काढण्यासाठी पैसे पाकिटातून काढण्याचे प्रयत्न करीत असतांना तेव्हा आपली पोत गायब झाल्याचे दिसुन आले , सदरचा प्रकार महिलेने वाहक यांना सांगितले असता एसटी बस यावल पोलीस ठाण्यात आणण्यात आली मात्र यात काही लिष्पन्न झाले नाही.यावल पोलीस ठाण्यात कर्मचाऱ्यांची संख्या ही कमी असल्याचे नेहमीच कारण असून बस स्थानकावर पोलीस बंदोबस्त ठेवणे अत्यंत गरजेचे असल्याचे प्रवाशी वर्गातुन व्यक्त होत असुन , वारंवार बसस्थानकाच्या परिसरात होणाऱ्या चोऱ्यांच्या संदर्भात आगाराचे व्यवस्थापक दिलीप महाजन यांनी वारंवार पोलीस ठाण्याला आदीच तक्रारीचे पत्र व्यवहार केलेला असून असे असतांना ही पोलीसांचा बंदोबस्त देण्यात येत नाही. पोलीस प्रशासनाच्या दुर्लक्षीत कारभाराने चोरट्यांना चांगलेच फावत असल्याचे संत्पत प्रतिक्रीया प्रवासांकडून व्यक्त होत आहे . सध्या लग्नसोहळयांचे कार्य सुरू असल्याने मोठी प्रवासांची वर्दळ बसस्थानकावर दिसत असुन . याशिवाय शासनाने महिलांच्या अर्ध्या तिकिटाची सवलत महिलांना दिल्याने एसटीने प्रवास करण्यासाठी मोठी गर्दी दिसुन येत आहे.
चोरट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी यावल पोलीस ठाण्यातील संबंधितांनी या ठिकाणी त्वरित बंदोबस्त वाढवावा अशी मागणी नागरीकांच्या वतीने होत आहे.