जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिंदी येथे विद्यार्थ्यांची घोडा, फोर व्हीलर कार, ऑटो रिक्षा, बैलगाडी आणि ट्रॅक्टर वरून मिरवणूक काढून विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिंदी येथे विद्यार्थ्यांची घोडा, फोर व्हीलर कार, ऑटो रिक्षा, बैलगाडी आणि ट्रॅक्टर वरून मिरवणूक काढून विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला.

आज जळगाव जिल्ह्यातील सर्व शाळा सुरू झाल्यात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिंदी शाळेमध्ये विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव विद्यार्थ्यांची वाजत गाजत सजवलेल्या घोड्यावरून, फोर व्हीलर कार मधून, ऑटो रिक्षा मधून बैलगाडी वरून ट्रॅक्टर वरून मिरवणूक काढून प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. त्यानंतर शाळेमध्ये सर्व विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प, फुगे, गोड जेवण देऊन, साजरा करण्यात आला. त्यानंतर शाळा पूर्वतयारी मेळावा क्रमांक दोन घेण्यात आला. यामध्ये विविध प्रकारचे स्टॉल लावण्यात आलेले होते. प्रत्येक स्टॉल वरती विविध प्रकारचे खेळ, चित्रकाम, अंक मोजणे अक्षर ओळख वजन उंची घेणे. विद्यार्थ्यांना हसत खेळत आनंदाने माहिती देण्यात आली. त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मोफत पाठ्यपुस्तक देऊन साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष कांचन परदेशी, सदस्य विक्रमसिंग चव्हाण, पशु वैद्यकीय डॉ सचिन महाजन, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य चारुलता कोल्हे, अनिता तायडे, ग्रामपंचायत सदस्य युनूस छप्परबंद आनंदा सपकाळे आणि पालक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक भगवान बडगुजर,समाधान जाधव, मीनाक्षी पाटील, प्रीती फेगडे यांना परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांच्या मिरवणुकीसाठी घोडा संदीप सपकाळे यांनी दिला. ट्रॅक्टर उपसरपंच कैलास पाटील, ऑटो रिक्षा विक्रमसिंग चव्हाण, कांचन परदेशी, फोर व्हीलर कार डॉ सचिन महाजन, युनूस छप्परबंद, बैलगाडी ललित परदेशी यांनी उपलब्ध करून दिली. त्याबद्दल त्यांचे सर्व गावकरी, विद्यार्थी, पालक, पदाधिकारी यांनी खूप कौतुक केले आणि सर्वांच्या वतीने त्यांचे आभार मानले.