अटल बिहारी वाजपेयींच्या जन्मदिनी मोदी करणार १०० रुपयाच्या नाण्याची घोषणा !

0

नवी दिल्ली-माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी शंभर रुपयाचे नाणे जाहीर करणार आहे. या नाण्यावर भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांचे छायाचित्र असणार आहे. नाण्याचे वजन ३५ ग्रॅम असणार आहे. नाण्याच्या अग्रभागी ‘सत्यमेव जयते’ लिहिले जाणार आहे.

२५ डिसेंबर रोजी अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती आहे. संपूर्ण देशात सुशासन दिन म्हणून साजरा केला जातो.