या देशाने महान पुत्र गमविला-राहुल गांधी

0

नवी दिल्ली-भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे आज निधन झाले. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण देशात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या निधनामुळे राजकीय क्षेत्रातून प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी देशाने महान पुत्र गमावल्याचे ट्वीटरद्वारे सांगितले आहे.

तसेच अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनाची बातमी अत्यंत वेदनादायक आहे, अशी प्रतिक्रिया माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी दिली आहे. अटलजींनी देशाला आपले आयुष्य अर्पण केले होते, एक महान राजकारणी, अद्वितिय लोकसेवक, प्रभावी कवी, शानदार वक्ता, उत्कृष्ट खासदार आणि महान माणूस देशाने गमावला आहे. आधुनिक भारतातल्या प्रमुख नेत्यांपैकी अटल बिहारी वाजपेयी एक होते. या देशाला त्यांची कमतरता कायम भासेल असेही मनमोहन सिंग यांनी म्हटले आहे. मी त्यांच्याकडून अनेक गोष्टी शिकलो त्यांच्या जाण्याने देशाने एक महान नेता गमावला आहे असेही सिंग यांनी स्पष्ट केले. ट्विटरवरून त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.