अटलजींच्या जाण्याने एका युगाचा अंत-मोदी

0

नवी दिल्ली-भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे आज प्रदीर्घ आजाराने निधन झाले. ते ९३ वर्षांचे होते. दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अटल बिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

मी नि:शब्द झालोय, वाजपेयींच्या निधनाने मी शून्यात गेलो आहे. पण मनामध्ये भावनांचा उद्रेक होत आहे. आपले सर्वांचे श्रद्धास्थान असलेले अटलजी आपल्यात राहिले नाहीत. त्यांनी आपल्या जिवनातील प्रत्येक क्षण देशासाठी अर्पित केला. अटलजींच्या जाण्यानी एका युगाचा अंत झाल्याची भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरून व्यक्त केली.