भुसावळ l
शहरातील डेली मार्केट, आठवडे बाजार, अप्सरा चौक भागातील गणेश ट्रेंड्स चे मालक मोहनलाल चावरीया यांना रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास मोटरसायकलने आलेल्या दोन तरुणांनी बंदूक व चाकू लावून लुटण्याचा प्रयत्न केला. याबाबत असे की,गणेश ट्रेंड्स चे मालक मोहनलाल चावरीया ता. १० रोजी रात्री साडेदहा वाजेला किराणा दुकान बंद करून दुकानाच्या पाया पडत असतांना दोन अनोळखी इसम प्लसर मोटरसायकलने आले व दुकान मालकास पाठी मागून बंदूक व चाकू लावून हातातील पैशांची बॅग हिसकविण्याचा प्रयत्न केला मात्र बँग हातातून न सुटल गळ्यातील चैन तोडून दोन इसम मोटरसायकलने पसार झाले. घटनास्थळी शहर पोलीस स्टेशनचे प्रभारी निरीक्षक गजानन पडघन व बाजारपेठ पोलीस स्टेशनचे कर्मचारी दाखल झाले आहेत. परीसरातील सी.सी.टीव्ही कॅमेरे तपासणी करीत आरोपींचा शोध घेत आहे. अद्यापावतो गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही