बनावट मृत्यूपत्राआधारे जमिनीवर ताब्याचा प्रयत्न;धुळ्यात 11 जणांवर गुन्हा

धुळे | प्रतिनिधी

बनावट मृत्यूपत्राच्या आधारावर जमीन हडप करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली 11 जणांविरुद्ध धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेत न्यायालयाचीही फसवणूक झाली असून केवळ आर्थिक फायद्यासाठी हे कटकारस्थान रचले गेल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
यासंदर्भात सुधीर जाधव (रा.सिद्धार्थ नगर, चितोड रस्ता,धुळे) यांनी तक्रार दिली आहे. तक्रारीनुसार 30 डिसेंबर 2006 ते दोन जून 2017 या कालावधीत सुधीर जाधव यांच्याशी सौदा पावती करारनामा करण्यात आला असताना संजय अहिरे, राजेंद्र अहिरे, लतिका बर्डे, मनोज पवार, संदीप पवार, शिवाजी कापुरे,परेगाबाई कापुरे, दिलीप कापुरे, उमेश कापुरे आणि बजयाबाई मोरे यांनी बनावट मृत्यूपत्र बनविले. दस्तावेज खोटा आहे हे माहीत असूनही तो खरा असल्याचे भासवून जाधव यांची फसवणूक केली. खोटी स्वाक्षरी करून या प्रकरणात न्यायालयाचीही फसवणूक केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.