औरंगाबादमध्ये किरकोळ कारणावरुन दगडफेक

0

औरंगाबाद :- औरंगाबादमध्ये गांधीनगर परिसरात दोन गटात किरकोळ कारणावरुन वाद झाल्याने तणाव निर्माण झाला होता. त्यामुळे शहरातील गांधीनगर, मोती कारंजा, रोजा बाग या सिटी चौक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील परिसरात पडसाद उमटले. यानंतर काही भागांमध्ये वाहने आणि दुकानांची जाळपोळ करण्यात आली. तसेच परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी दाखल झालेल्या पोलिसांच्या तुकडीवर देखील काही जमावांनी दगडफेक केली. या दगडफेकीमध्ये एकाचा मृत्यू झाला असून 25 जण जखमी झाले आहेत. त्यात पोलिस कर्मचार्‍याचा समावेश आहे.जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

औरंगाबामधील गांधीनगर परिसरात शुक्रवारी मध्यरात्री उभ्या असलेल्या दोन गटात शुल्लक कारणामुळे वाद झाला होता. त्यामुळे तणाव निर्माण झाला होता. परंतू या वादामुळे वेगळेच वळण लागले. दरम्यान, नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. शहरातील तणावपूर्ण वातावरणाच्या पार्श्वभूमीवर जालन्यावरुन अतिरिक्त कुमक मागवण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. जाळपोळीच्या घटनेमुळे शहागंज भागात घरात एका सिलिंडरचा स्फोट झाल्याचे वृत्त आहे.