सिडनी-भारत वि ऑस्ट्रेलियात सिडनी येथे होणाऱ्या चौथ्या कसोटी सामन्यासाठी भारताने आपल्या संघाची घोषणा केली आहे. भारताने संघात तीन बदल केले आहेत. इशांत शर्माला आराम देण्यात आला आहे. तर रोहित शर्माने चौथ्या कसोटीतून माघार घेतली आहे. भारताने १३ जणांच्या संघामध्ये समावेश केला आहे.
सिडनीची खेळपट्टी फिरकी गोलंदाजांना साजेशी असल्यामुळे भारत दोन फिरकी गोलंदाजासह मैदानात उतरण्याची शक्यता आहे. अश्निनची निवडही फिटनेस चाचणीनंतर केली जाईल असे बीसीसीआयने स्पष्ट केले आहे. केएल राहुलला संधी देण्यात आली आहे. मयंक अग्रवाल आणि केएल राहुल यांच्यावर सलामीची जबाबदारी असणार आहे.
असा आहे संघ
विराट कोहली, अजिंक्य रहाणे, केएल राहुल, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, पंत, रविंद्र जाडेजा, कुलदीप यादव, आर. अश्निन, शामी, बुमराह आणि उमेश यादव