मेलबर्न – ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा माजी डावखुरा वेगवान गोलंदाज मिचेल जॉन्सनने सर्व प्रकारच्या सामन्यातून आपली निवृत्ती जाहीर केली आहे. 2015 मध्ये त्याने आंतरराष्ट्री सामन्यांना अलविदा केले होते. त्यानंतर मात्र टी-20 सामन्यात तो विविध देशात होणाऱ्या स्पर्धेत तो खेळत होता. या आगोदरच त्याने ऑस्ट्रेलियातील बिग बॅश स्पर्धेत आपण खेळणार नसल्याचे जाहीर केले होते. आता पहिल्या सारखे शरीर साथ देत नसल्यामुळे त्याने सर्व सामन्यातून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. आयपीएल स्पर्धेत त्याने कोलकाता संघाचे प्रतिनिधित्त्व केले होते.