ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यासाठी भारतीय संघ जाहीर

0

मुंबई-मेलबर्न येथे तिसऱ्या कसोटी सामन्याला बुधवारपासून सुरुवात होणार आहे. पहिला सामना भारताने तर दुसरा सामना ऑस्ट्रेलियाने जिंकल्याने मालिकेत सध्या बरोबरी आहे. चार सामन्यांच्या कसोटी मालिकेनंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्याविरुद्ध वन डे मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी बीसीसीआयने संघाची घोषणा केली. या मालिकेत महेंद्रसिंग धोनी संघात पुनरागमन करणार आहे.

ऑक्टोबर महिन्यात झालेल्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या दौऱ्यात धोनी अखेरचा खेळला होता. मात्र, त्याची कामगिरी समाधानकारक झालेली नाही. त्याला २०१८ मध्ये १३ डावांत २५ च्या सरासरीनेच धावा करता आल्या आहेत. पदार्पणानंतरची त्याची ही सर्वा निच्चांक कामगिरी आहे.

असा आहे संघ

वन डे संघः विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा ( उपकर्णधार), लोकेश राहुल, शिखर धवन, अंबाती रायुडू, दिनेश कार्तिक, केदार जाधव, महेंद्रसिंग धोनी (यष्टिरक्षक), हार्दिक पांड्या, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, रवींद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमरा, खलील अहमद, मोहम्मद शमी

ट्वेंटी-20 संघः
विराट कोहली ( कर्णधार), रोहित शर्मा ( उपकर्णधार), लोकेश राहुल, शिखर धवन, रिषभ पंत, दिनेश कार्तिक, केदार जाधव, महेंद्रसिंग धोनी ( यष्टिरक्षक), हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमरा, खलील अहमद.

वन डे मालिकेचे वेळापत्रक
ऑस्ट्रेलियाः १२ जानेवारी ( सिडनी), १५ जानेवारी ( अॅडलेड) आणि १८ जानेवारी (मेलबर्न)
न्यूझीलंडः २३ जानेवारी, २६ जानेवारी, २८ जानेवारी, ३१ जानेवारी आणि ३ फेब्रुवारी
न्यूझीलंड ( ट्वेंटी-20 मालिका) : ६ , ८ व १० फेब्रुवारी.