ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानपदी स्कॉट मॉरिसन

0

हैदराबाद – ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानपदी स्कॉट मॉरिसन यांची निवड झाली आहे. माल्कम टर्नबुल यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला. पक्षांतर्गत बंडानंतर माल्कम टर्नबुल यांनी राजीनामा दिला. शिवाय माल्कम यांच्या मंत्रीमंडळातील ३ महत्त्वाच्या मंत्र्यांनी माल्कम यांचा पाठिंबा काढून घेतल्याने त्यांचे पंतप्रधान पद जाण्याचा धोका निर्माण झाला होता. परिणामी ऑस्ट्रेलियाच्या राजकारणात मोठे फेरबदल पाहायला मिळत आहे.

पक्षाचे खजिनदार मॉरिसन यांनी ऑस्ट्रेलियाचे गृहमंत्री पीटर डुटन यांचा पराभव केला. पण डुटर हे स्वतः माल्कम यांचे सर्वात मोठे विरोधक होते आणि त्यांनीच गुरुवारी माल्कम यांना आव्हान दिले होते. गेल्या दशकभरात पक्षांतर्गत नेतृत्वाच्या चढाओढीसाठी चारवेळा पंतप्रधान बदलले गेले. माल्कम यांनी पदाचा राजीनामा देत मध्यवर्ती निवडणुका होण्याची शक्यता वर्तवली आहे.

गेल्या आठवड्यात उर्जासंबंधीच्या धोरणावरुन मोठी राजकीय वादळं निर्माण झाली होती. त्यावरुनही माल्कम यांच्या सरकारला स्वतःच्या पक्षातूनच विरोध करण्यात आला. त्यातच मॉरिसन हे पक्षाच्या खजिनदार पदाच्या निवडणुकीत डुटन यांच्यापेक्षा वरचढ ठरल्याने माल्कम यांचा विरोध आणखीन तीव्र झाला.

ऑस्ट्रेलियात दशकभरात पक्षांतर्गत स्पर्धेमुळे दोन पंतप्रधानांना आपलं पद सोडण्याची वेळ आली. टॉनी अॅबॉट यांनी १ डिसेंबर २००९ ते १२ सप्टेंबर २०१५ या काळात पंतप्रधान पद भुषवले. पण पक्षाच्या अंतर्गत संघर्षामुळे त्यांच्या जागी माल्कम टर्नबुल यांच्या गळ्यात पंतप्रधानपदाची माळ १४ सप्टेंबर २०१५ ला पडली. त्याच पक्षनेतृत्वाच्या चढाओढीची झळ माल्कम यांनादेखील सोसावी लागली. आता त्यांच्या जागी स्कॉट मॉरिसन यांना पंतप्रधानपद मिळाले