सिडनीः भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिका होणार आहे. सर्वांचे लक्ष या मालिकेकडे लागले आहे. दरम्यान ऑस्ट्रेलियन संघातील खेळाडू ख्वाजाच्या भावाला दहशतवादी हल्ल्याचा कट रचल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. अर्सलान ख्वाजाला ऑस्ट्रेलियन पोलिसांनी अटक केली आहे. 39 वर्षीय अर्सलानला पश्चिम सिडनीतील पॅरामाट्टा येथून अटक करण्यात आली.
ऑस्ट्रेलियन संघाला ख्वाजाकडून मोठी अपेक्षा आहे. भारतीय कर्णधार विराट कोहलीपेक्षा ऑस्ट्रेलियाचा ख्वाजा कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करेल, असा अंदाज वर्तविला जात आहे. मात्र मालिकेला सुरुवात होण्यापूर्वीच ख्वाजाच्या अडचणी वाढल्या आहेत.
या प्रकरणावर मी प्रतिक्रिया देणे योग्य ठरणार नाही. पोलीस याबाबत तपास करत आहेत आणि पोलीस त्यांचे काम चोख करतील, असा मला विश्वास आहे. या काळात माझ्या आणि कुटुंबियांच्या खाजगी आयुष्यात ढवळाढवळ करू नका, अशी मी विनंती करतो.’ असे उस्मान ख्वाजा यांनी सांगितले आहे.
एका पुस्तकात दहशतवादी हल्ल्याचा कट रचल्याची नोंद करण्यात आली होती. या नोंदीत माजी परराष्ट्र मंत्री ज्युली बिशॉप, माजी पंतप्रधान मॅल्कोल्म टर्नबूल आणि अन्य महत्त्वांच्या व्यक्तींवर हल्ला करण्याचा उल्लेख होता. या प्रकरणी मोहमद निझामदीन यालाही अटक केली आहे.